शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 31 ऑगस्ट 2014 (22:32 IST)

किंग खान झाला इंटरपोलचा अँम्बेसेडर

भारतातून बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची इंटरपोलने टर्न बॅक क्राईम या अभियानासाठी अँम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. या मोहिमेतून गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रत्येकजण काय करू शकतो याविषयी जागरुकता निर्माण करण्यात येणार असून इंटरपोलच्या जागतिक मोहिमेसाठी पहिल्यांदाच एका भारतीयाची अँम्बेसेडर म्हणून निवड झाल्याचे शाहरुखने सांगितले. नागरिक जेव्हा कायद्याचा आदर करुन गुन्हेगारी विरुध्द लढा देतात तेव्हा त्याचा फायदा सर्व समाजाला होतो हा संदेश देताना शाहरुख दिसणार आहे. इंटरपोलच्या टर्न बॅक क्राईम अभियानाचा अँम्बेसेडर होणे हा विशेष सन्मान असल्याचे शाहरुखने सांगितले. धमकावून, गुन्हे करुन जे आपल्यावर दहशत निर्माण करतात त्यांना घाबरवण्याची वेळ आता आली आहे. समजातील गुन्हेगारी, अपप्रवृत्तींविरोधात आपण एकत्र येऊन लढू शकतो. आपण लढलेच पाहिजे असे शाहरुखने म्हटले आहे. इंटरपोलच्या या मोहिमेचा जॅकी चॅनही अँम्बेसेडर आहे. फुटबॉलपटू लायोनेल मेसी, फॉम्र्युला वन चालक फर्नाडो ओलान्सो, किमी रायकोनेन यांनीही या अभियानाचे समर्थन केले आहे.