शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

किंग खानवर फिदा आलिया!

‘डियर जिंदगी’ या चित्रपटात शाहरुख खानसोबत अभिनेत्री आलिया भट्ट काम करीत असून तिने त्याच्यासोबत काम करतानाचा आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणते, अतिशय आश्चर्यकारक अनुभव आहे. 
 
त्याच्यासोबत काम करण्याचा खूप आनंद मला आहे. तो अतिशय व्यावसायिक कलाकार आहे. 
 
‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या आलियाने ‘हायवे’, ‘टू स्टेटस’, ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’, ‘कपूर अँड सन्स’ यासारख्या चित्रपटातून अभिनय केला आहे. गौरी शिंदे दिग्दर्शन करीत असलेल्या ‘डियर जिंदगी’ चित्रपटात ती शाहरुखसोबत काम करीत आहे.