गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

किशोर कुमार यांच्या पुण्यतिथीनिमित्त

WD
भारतीय चित्रपटसृष्‍टीचा इतिहास लिहायचा झाल्‍यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्णच होउ शकणार नाही. 60 च्‍या दशकातील देवआनंद पासून ते 80 च्‍या दशकातील अनिल कपूर पर्यंतच्‍या अनेक नायकांना यशाची चव चाखविण्‍यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलीवूडला पहिला सूपरस्‍टार राजेश खन्‍ना यांच्‍या रुपाने मिळाला मात्र त्‍यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्‍नरी नायक व गायकाच्‍या पुण्यतिथीनिमित्‍त....

गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे. किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत. चित्रपटातही ते चमकले व अभिनयातूनही किशोरदांच्या स्मृती जिवंत आहेत.

बारा वर्षाचे किशोरदा रेडिओवर गाणे ऐकून स्वत: त्याच्या धुनांवर थिरकत होते. तसेच चित्रपटामधील गीतांची पुस्तके जमा करून त्यातील गीतांना वेगळ्या शैलीत घरी आलेल्या पाहुण्यासमोर अभिनयासह सादर करत व त्यांच्याकडून बक्षीसही मागून घेत असत.

किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करियरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते.

मोठे बंधू 'दादामुनी' अशोक कुमार यांच्‍या मदतीने यांच्‍या मदतीने बॉलीवूडमध्‍ये प्रवेश केलेल्‍या आभास कुमार यांनी आपले नाव बदलवून किशोर कुमार करून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्‍या काळात बॉम्बे टॉकीजमध्ये समूहगायक म्हणून काम करीत असलेला हा उमदा गायक नंतर एक नामांकित हास्‍य अभिनेता आणि बॉलीवूडमधील सर्वाधिक गाजलेले गायक किशोरदा झाले. हिंदी चित्रपटसृष्‍टीचा इतिहास या गायकाशिवाय पूर्ण होणेच शक्‍य नाही. देव आनंद, राजेश खन्‍ना, अमिताभ बच्‍चनपासून ते नंतरच्‍या काळात ऋषीकपूर व अनिल कपूरपर्यंतच्‍या नायकांच्या यशात किशोरदांचे योगदान महत्त्वाचे आहे. 13 ऑक्टोबर 1987 रोजी मुंबईत हृदयविकाराचा झटका लागल्यामुळे त्यांचे निधन झाले.

WD
काय तुम्हाला माहीत आहे....

1975-77मध्ये आणीबाणीच्या वेळेस संजय गांधीने किशोर कुमार यांना मुंबईत इंडियन नॅशनल काँग्रेस रॅलीसाठी एक गीत गायीला सांगितले होते पण त्यासाठी किशोर कुमाराने नकार दिल्यामुळे भारतातील सर्व रेडिओ व टीव्हीवर किशोर कुमार यांच्या गीतांवर अनऑफिशियल बॅन लावण्यात आला होता.

60 च्या दशकात त्यांनी गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष दिले होते, पण त्याबाबत ते जास्त गंभीर नव्हते. सेटवर उशीरा येणे व तेथे मस्करी केल्याने त्यांचे चित्रपट फ्लॉफ होऊ लागले. इतकंच नव्हेतर त्यांना इन्कम टॅक्सला घेऊनसुद्धा अडचणींचा सामना करावा लागला.

1980च्या दरम्यान किशोर कुमार यांनी अभिताभ बच्चनसाठी गाणे गाण्यास नकार दिला होता. त्याचे कारण म्हणजे किशोरने आपल्या एका चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना पाहुण्या कलावंताची भूमिका करण्यास सांगितले होते, जी अमिताभने स्वीकारी नाही. त्या घटनेनंतर त्यांनी अमिताभसाठी बरेच वर्ष गाणे गायले नाही.

जेव्हा त्यांची तिसरी बायको योगिता बालीने मिथुन चक्रवर्तीशी लग्न केले, तेव्हा किशोर कुमारने मिथुन चक्रवर्तीसाठी आपला आवाज देण्यास मना केला. पण थोड्याच वर्षांनंतर सर्वकाही विसरून त्यांनी मिथुनसाठी चित्रपट डिस्को डांसर, मुद्दत व प्यारका मंदिर साठी गीत रेकॉर्ड केले.

लता मंगेशकर सोबत त्यांनी 327 गाणे गायले.

किशोर कुमार यांच आवडत गीत आहे चित्रपट काफिला (1952)मधील 'वे मेरी तरफ यूं खींचे चले आ रहे हैं.... '

फिल्मफेअर अवॉर्ड विजेते

रूप तेरा मस्ताना आराधना 1961
दिले एका किसीने अमानुष 1975
खइके पान बनारस डॉन 1978
हजार राहें मुडके थोडीसी बेवफाई 1980
पग घुंघरू बांध नमक हलाल 1982
हमें और जीने की अगर तुम न होते 1983
मंजिलें अपनी शराबी 1984
सागर किनारे सागर 1985