गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (15:40 IST)

कॅट 'सातवे आसमाँ'वर!

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कतरिना कैफ स्टार 'बँग बँग' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत २५0 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. या चित्रपटाच्या यशामुळे कतरिना कैफ खूप आनंदी आहे. कतरिनाचे मागील चित्रपट पाहिले असता तिने नेहमी मोठा स्टारडम असलेल्या नायकांसोबतच चित्रपट केल्याचे प्रकर्षाने दिसून येते. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान आणि हृतिक रोशन कतरिनाच्या चित्रपटांचे नायक आहेत. 'अजब प्रेम की गजब कहानी' पूर्वी आपला रणबीर कपूरशी परिचय नव्हता, असे कतरिनाने सांगितले. ती सध्या आदित्य रॉय कपूरसोबत 'फितूर'मध्ये काम करत आहे.