शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (12:15 IST)

कॅटरिनाने घेतली होती रणबीरची काळजी

काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरच्या टॉन्सिलचे ऑपरेशन झाले. यादरम्यान कॅटरिना कैफने रुग्णालयामध्ये पूर्णवेळ त्याची शुश्रूषा केली. शुश्रूषा करणारीच एवढी सुंदर असेल तर रुग्णालयातून डिस्चार्ज घेण्याची रुग्णाची इच्छा होत नाही. तिकडे आजाराचा उत्सव असाच सुरू राहावा, अशी शुश्रूषा करणारीचीदेखील इच्छा असते. जेणेकरून रुग्णाच्या इतक्या जवळ येण्याची संधी गमावता येऊ नये. जणूकाही ‘मतलबे इश्क का इक ढंग निराला देखा, सबक जिसको याद हुआ, उसे छुट्टी मिले.’ याच काळात आपल्या फुफ्फुसांमध्ये श्वासांचा शोध घेणारे रणबीरचे जवळचे नातेवाईक वयोवृद्ध शशी कपूर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. श्वासांचा धागा मजबूत आहे. शशी कपूर रुग्णालयातील खाटेवर आठवणींचा क्लोरोफॉर्म घेऊन तारुण्यातील प्रेमगीत म्हणत होते तेव्हा त्यांचा युवा नातेवाईक रणबीर कपूर आपल्या प्रेमाच्या पहाटेमध्ये धुंद होता. जणूकाही रुग्णालयातच पहाट आणि सायंकाळ गळाभेट घेत असावेत. अशा वेळी शैलेंद्र यांनी ‘मधुमती’साठी लिहिलेल्या गाण्याच्या ओळी आठवतात, ‘वह आसमां झुक रहा हैं जमीं पर, ये मिलन हमने देखा यहीं पर, सुहाना सफर और ये मौसम हंसी, हमें डर है हम खो ना जायें कहीं.’