गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कॅटसाठी चित्रपट बनवणार सलमान!

रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिनाला सलमान खानचा चांगला आधार मिळाला आहे. आता सलमान कॅटरिनासोबत चित्रपट बनवायचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते. कॅटरिनाचे चित्रपट अलीकडे फारसे यश मिळवत असताना दिसत नाहीत. 
 
तिचा ‘फँटम’ पाठोपाठ ‘फितूर’ बॉक्स ऑफिसवर कमाई न करू शकल्यामुळे सलमान खान तिचा तारणहार होऊ शकतो. कॅटरिना आणि सलमानचे पूर्वी ब्रेकअप झालेले असले तरी त्यांच्यातील संवाद बंद झालेला नव्हता. त्यामुळे आपल्या पूर्व प्रेयसीसाठी सलमान एवढे नक्कीच करू शकतो. सलमान खान आणि कॅटरिना यांनी यापूर्वी ‘युवराज’, ‘मैंने प्यार क्यूं किया’ आणि ‘एक था टाइगर’ या चित्रपटातून काम केले होते. आपले करिअर सावरण्यासाठी सलमानचा मोठा आधार होऊ शकतो याची कल्पना कॅटरिनाला आहे.