गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (12:47 IST)

केजरीवाल यांची भूमिका साकारणार इरफान

बॉलिवूड वर्तुळात इरफान खानच्या आगामी सिनेमाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. परंतु चित्रपटाचे शीर्षक ठरले नसल्यामुळे काहीच स्पष्ट होऊ शकत नव्हते. पण बातमी आता अशी आहे, की चित्रपटाचे नामकरण झाले असून त्याचे नाव ‘मदारी’ असल्याचे बोलले जात आहे. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीचे काही क्षण या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत.

‘फोर्स’चा दिग्दर्शक निशिकांत कामत सोशियो पॉलिटीकल ड्रामावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून चित्रपटामध्ये इरफान दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भूमिका साकारणार असून एक सामान्य माणसाची भ्रष्टाचारच्या विरोधात असलेली लढाई सिनेमात दाखवणार आहे. इरफानशिवाय या सिनेमात जिम्मी शेरगिलसुध्दा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘मदारी’ सिनेमा हैदराबाद, राजस्थान, दिल्ली, डेहराडून, शिमला आणि शिल्लक शेड्यूल मुंबईमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. मदारीव्यतिरिक्त इरफान खानचा ‘हैदर’ आणि ‘वेलकम टू कराची’ हे चित्रपटदेखील प्रदर्शित होणार आहेत.