शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :बंगळुरू , बुधवार, 29 जून 2016 (12:23 IST)

चित्रपट शुक्रवारीच का प्रदर्शित होतात?

दर शुक्रवारी आपल्या देशात कोणताही नवीन चित्रपट प्रदर्शित केला जातो. पण शुक्रवारीच का नवीन चित्रपट प्रदर्शित केला जातो याचे कारण तुम्हाला माहीत आहे का?
 
1950च्या अखेरीस भारतात शुक्रवारी चित्रपट रिलीज करण्याची पद्धत सुरु झाली. 5 ऑगस्ट 1960मध्ये शुक्रवारी मुगल-ए-आजम हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. मुगल-ए-आजमला मिळालेले यश पाहता नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्याची पद्धत सुरु झाली. त्याकाळी भारतात कलर टीव्ही नव्हता. त्यानंतरही चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित करण्यास सुरुवात झाली. तसेच अधिकाधिक लोकांनी चित्रपट पाहावे यासाठी मुंबईतील कंपन्यांमध्ये शुक्रवारच्या दिवशी हाफ डे देण्यात येत असे. तसेच यामागे आणखी एक कारणही आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात कार्यालयांना तसेच शाळांना सुटी असते. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कमाई चांगली व्हावी या उद्देशाने चित्रपट शुक्रवारी रिलीज करण्यात येत असे.