मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 24 ऑगस्ट 2016 (12:22 IST)

जगातील सर्वात जास्त कमाई करणार्‍या नायिकांच्या फोर्ब्सच्या यादीत दीपिकाचे नाव

जगातील 10 सर्वात जास्त कमाई करणार्‍या नायिकांच्या यादीत भारतीय अभिनेत्री दीपिका पादुकोणचे नाव आले आहे. या यादीत सामील सर्व नायिकांची कमाई एक कोटी डॉलर आहे. या यादीत ऑस्कर विजेता जेनिफर लॉरेंस, जुलिया रॉबर्ट्स आणि ‘फ़्रेंड्स’’ फेम अभिनेत्री जेनिफर एनिस्टन सारख्या दिग्गज नायिका सामील आहेत. फोर्ब्स 2016च्या यादीत 30 वर्षीय पादुकोण एकुलती एक भारतीय अभिनेत्री आहे. यात ती दहाव्या क्रमांकावर आहे. फोर्ब्सचे म्हणणे आहे की पादुकोणची बाजीराव मस्तानी आणि पीकू सारखे बॉलीवूड चित्रपटांनी  बॉक्स ऑफिसवर भारी कमाई केली आहे. पण हॉलिवूड नायिकांच्या तुलनेत चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्यांना कमी पैसा मिळतो, पण  ‘किमान दर्जनभर जाहिराती’मुळे होणार्‍या कमाईने हे अंतर कमी होऊन जाते.