शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By wd|
Last Updated :मुंबई , मंगळवार, 22 एप्रिल 2014 (17:35 IST)

जिया खान मृत्यूप्रकरण आता पोलिस आयुक्तांकडे

बॉलिवूडमधील अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात काहीच तृटी असल्यास जियाच्या आईने पोलिस आयुक्तांकडे अर्ज करावा आणि आयुक्तांनीच यावर योग्य तो निर्णय घ्यावा, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे.

जियाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळला होता. त्यामुळे तिने आत्महत्या केली की तिचा खून झाला याबाबत तर्कवितर्क मांडले जात होते. आदित्य पांचोलीचा मुलागा सुरज याने जियासोबतचे प्रेमसंबंधांना पूर्णविराम दिल्यानंतरच जियाने आत्महत्या केली, त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करणारी याचिका जियाच्या आईने हायकोर्टात सादर केली होती. त्यानंतर सुरज पांचोली विरोधात जियाला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

जियाच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने जियाच्या आईने याबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार सांगितले. तसेच या प्रकरणी सुनावणी एक आठवड्यापर्यंत तहकूबही केली.