शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 7 ऑक्टोबर 2015 (11:36 IST)

जेडीमध्ये अमरसिंग नेत्याच्या भूमिकेत

समाजवादी पार्टीचे माजी नेते अमरसिंग जेडी नावाच्या चित्रपटात राजकीय नेत्याच्या भूमिकेत चमकणार आहेत. चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून सोमवारी त्यासाठी अमरसिंग नॉईडा येथे आले होते. सुरुवातीला त्यांच्या भोवतीची माणसे पाहून ते पत्रकार परिषद घेणार असावेत असा बाकी लोकांचा समज झाला मात्र ते चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले असल्याचे समजताच त्यांच्या भोवती प्रचंड गर्दी जमली.
 
पत्रकाराच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आहेत शैलेश पांडे. अमरसिंग यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर ते राजकीय क्षेत्रात एकाकी झाले आहेत. मात्र त्यांनी यापूर्वीही चित्रपटात भूमिका केल्या आहेत. एका मल्याळी फिल्ममध्ये त्यांनी काम केले आहे तसेच बॉम्बे मिठ्ठाई नावाच्या चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल हिच्या नवर्‍याची भूमिकाही केली आहे. अन्य काही हिंदी चित्रपटातही त्यांनी छोटे रोल केले आहेत.