गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 21 एप्रिल 2014 (14:04 IST)

जॉन होणार पुन्हा अंडरवर्ल्ड डॉन

बॉलिवूडचा माचोमैन जॉन अब्राहम आता आगामी काळात पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी अभिनेता जॉनने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संजय गुप्ताच्या ‘शूट आउट अँट वडाला’ या सिनेमात अंडरवर्ल्ड डॉन मन्या सुर्वेची भूमिका केली होती. ही जॉनची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यामुळे आगामी काळात संजय पुन्हा एकदा अंडरवर्ल्डवर आधारित सिनेमाची निर्मिती करीत आहे. त्याच्या ‘मुंबई सागा’ या सिनेमात जॉन अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा आहे की, संजय गुप्ताच्या सिनेमात जॉन पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड डॉनचा रोल करताना दिसणार आहे. आगामी काळात येत असलेल्या या सिनेमात जॉन अब्राहमशिवाय अभिनेता अनिल कपूर, मनोज वाजपेयी, तुषार कपूर यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची शूटिंग ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे.