मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , रविवार, 14 ऑगस्ट 2011 (13:21 IST)

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचं निधन

ND

ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर यांचं आज (रविवार) सकाळी ५.१५ वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारामुळे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. या जिंदादिल नायकाच्या जाण्यानं सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. उद्या (सोमवार) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.

शम्मी कपूर यांना काही वर्षांपासून किडणीच्या विकार होता. अलीकडच्या काळात तर त्यांना आठवड्यातून तीन वेळा डायलेसिस करावं लागत होतं. गेल्या रविवारी तब्येत खालावल्यानं त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळत होता आणि तब्येतीत सुधारणाही दिसत होती. परंतु, काल अचानक त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आज पहाटे शम्मी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला.

शम्मी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये व त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन तसेच इतर नामवंतांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.