शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 मे 2015 (14:16 IST)

टायगरच्या ‘बागी’मध्ये श्रद्धा कपूर

निर्माता साजिद नाडियादवालाच्या बॅनरच्या आगामी ‘बागी’ चित्रपटाद्वारे ‘हीरोपंती’ची अभिनेता-दिग्दर्शक जोडी पुन्हा सोबत दिसणार आहे. शूटिंगला लवकरच सुरुवात करण्यात येणार असून टायगर श्रॉफची यामध्ये प्रमुख भूमिका आहे. सब्बीर खान यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘बागी’मध्ये आता फीमेल लीडसाठी श्रद्धा कपूरच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
 
‘आशिकी- 2’नंतर श्रद्धा कपूरचा ‘एक विलेन’देखील हिट ठरला. शिवाय शाहिदसोबतच्या ‘हैदर’चीदेखील बरीच प्रशंसा झाली. वरुण धवनसोबतचा ‘एबीसीडी-2’ देखील लवकरच प्रदर्शित होत आहे. नाडियादवालाच्या बॅनरचा आणि यूटीव्हीचा ‘बागी’ही तिच्या करिअरमधील आणखी एक मोठा चित्रपट ठरू शकतो. प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट पुढील वर्षी 15 एपिल्र रोजी प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी हा अँक्शन चित्रपट सलमान खान-नगमा अभिनीत ‘बागी’चा रिमेक असल्याची इंडस्ट्रीत चर्चा होती. यावर सब्बीर खाननी स्पष्टीकरण देताना हा रिमेक चित्रपट नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला.