शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

ट्रेनमध्ये प्रचार करतील घनचक्कर इमरान आणि विद्या

WD
बॉलीवूडकर आपल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी रोज वेग वेगळे प्रकारचे फंडे वापरतात. घनचक्करच्या टीमने देखील डोकं लावलं आणि निर्णय घेतला की त्यांच्या चित्रपटाचे मुख्य कलाकार इमरान हाशमी आणि विद्या बालन चित्रपटाचा प्रचार लोकल ट्रेनमध्ये बसून करतील. ट्रेन निवडण्याचे कारण? या चित्रपटात लोकल ट्रेनची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, म्हणून लोकल ट्रेनच्या माध्यमाने प्रचार करण्यात येत आहे. राजकुमार गुप्ता द्वारे दिग्दर्शित ‘घनचक्कर’एक अशा चोराची कथा आहे जो आपल्या गँगसोबत फार मोठी चोरी करतो आणि जेव्हा पैशांची वाटणी करण्याची गोष्ट येते तेव्हा तो आपली स्मृती गमावून बसतो. द डर्टी पिक्चरनंतर इमरान आणि विद्याचे हे दुसरे चित्रपट आहे.