शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2015 (10:39 IST)

डॉ. कलामांचं नावही न लिहिता येणार्‍या अनुष्कावर टीकेची झोड

एखाद्या चुकीबद्दल ट्विटरवासीय कुणालाही सोडत नाहीत.. मग तो नेता असो वा सेलिब्रिटी.. याचाच प्रत्यय अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला आलाय. 
 
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचं सोमवारी निधन झालं. यावर दु:ख व्यक्त करत अनुष्कानं डॉ. कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी ट्विटरची मदत घेतली. पण, इथंच ती तोंडावर पडली. यावेळी, अनुष्कानं ट्विटवर डॉ. कलाम यांचा ‘ए बी जे कलाम आझाद’ असा उल्लेख केला. त्यानंतर मात्र, ट्विटरवासियांनी अनुष्काला चांगलंच फैलावर घेतलं. इतकंच नाही, तर ज्या व्यक्तीचं नावही माहीत नाही, अशा व्यक्तीबद्दल न बोलण्याचा सल्लाही तिला काहींनी देऊन टाकला. 
 
यानंतर मात्र अनुष्काला आपली चूक लक्षात आली.. पण, ती पुन्हा चुकलीच.. अनुष्काला अब्दुल कलाम यांचं योग्य नाव लिहिण्यासाठी तब्बल 3 ट्विट्स टाकावे लागले.. तिसर्‍या ट्विटमध्ये तिनं कलाम यांचं योग्य नाव लिहिलं.