शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 मार्च 2014 (19:48 IST)

तापसी टू बॉलीवूड़.

अभिनेत्री तापसी पन्नूची दक्षिणेत चांगली ओळख निर्माण झाली आहे, परंतु आता ती स्वत:चे जास्तीत जास्त लक्ष बॉलीवूडच्या 
 
चित्रपटांवर केंद्रित करणार आहे आणि म्हणूनच तापसी चेन्नईहून मुंबईला आली आहे. होय, याबाबत वृत्त आहे की तापसी आता 
 
बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. म्हणून ती आता मुंबईमध्ये लवकरच शिफ्ट होण्याच्या तयारीत आहे. तसे तर 
 
ती याबाबतचे प्रय▪आधीपासूनच करत होती, पण आता कुठे तिला ते साध्य झाले आहे. तिने याबाबत माहिती देताना सांगितले की, 'मी 
 
हा निर्णय अचानक घेतलेला नसून पूर्ण विचारांती घेतला आहे. आधीपासूनच मी ठरविले होते की, मला मुंबईत शिफ्ट व्हायचे आहे. गत 
 
वर्षी डेविड धवन यांच्या 'चश्मेबहाद्दूर' चित्रपटातून तापसीने बॉलीवूडमध्ये पाऊल टाकले. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ती बॉलीवूडमध्ये 
 
पाय रोवेल असे म्हटले जात होते, पण हा चित्रपट पडल्याने तसे होऊ शकले नाही. लवकरच ती 'रनिंग शादी डॉटकॉम' नामक एका हिंदी 
 
चित्रपटात दिसणार आहे. तिला आशा आहे की, पुढेही तिच्याकडे बॉलीवूडचे चित्रपट येतील. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच तापसीचे 
 
बॉलीवूडमध्ये काय होईल हे लवकरच समजेल.