बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 28 जानेवारी 2015 (16:08 IST)

नवरा-बायकोचे आमने-सामने

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन कायमच चर्चेत राहणारे बॉलिवूडमधील जोडपे. या दोघांना एकत्र पाहणे त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असले तरी लवकरच अभिषेक-ऐवर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार असल्याचे समजते. थांबा, त्यांच्यातील हा लढा प्रत्यक्षातील नसून चित्रपट एकाचवेळी प्रदर्शित होणार असल्याने त्यांच्यात निराळीच स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही चित्रपट अभिषेक आणि ऐश्वर्याच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाचे आहेत. दीर्घ सुटीनंतर अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ‘जज्बा’मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. यासोबतच, ऐश्वर्या ‘ए दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होणार असून अभिनेता अभिषेक बच्चन साजिद-फरहादच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या हाऊसफुल्ल या चित्रपटात आहे. अभिषेकसोबत अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटदेखील जून महिन्यातच प्रदर्शित होणार आहे. एकाच महिन्यात या सेलिब्रिटी दाम्पत्याचे दोन भिन्न चित्रपट प्रदर्शित होत असल्याने प्रेक्षक कोणत्या चित्रपटाला प्रतिसाद देतात, याकडे सिनेजगताचे लक्ष लागले आहे.