शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

नव्या बाळाच्या ‘रुम’वर सैफिनाचा लाखोंचा खर्च !

चाहत्यांना सैफ अली खान आणि करिना कपूर यांना मूल होणार आहे याची कल्पना आहे. त्यांच्या घरी डिसेंबरमध्ये छोटय़ा पाहुण्याचे आगमन होणार असून सैफ आणि करिना चिमुकल्याच्या स्वागतासाठी खूप उत्सुक आहेत. येणार्‍या बाळासाठी नर्सरी रुम सजवण्यात ते गुंतले आहेत. ही रुम सजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 
 
सैफ अली खान अलीकडेच आपल्या नव्या बाळासाठी लंडनमधील हेरॉडस या प्रसिध्द दुकानात खरेदी करताना दिसला. सैफ आणि करिनाने नर्सरी रुम सजवण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय डिझायनरला काम सोपवले आहे. नर्सरी रुम तयार असून काही आवश्यक सजावट अद्याप बाकी आहे. 
 
कामाच्या पातळीवर करिना ‘वीर दे वेडींग’ चित्रपटात काम करीत आहे. सप्टेंबरमध्ये याचे शूटिंग संपेल आणि त्यानंतर ती बाळंतपणाच्या सुटीवर जाणार आहे. सैफ अली ‘शेफ’ या चित्रपटाच्या तयारीत आहे. हा हॉलिवूडचा रिमेक चित्रपट असेल.