शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2015 (10:32 IST)

नसीरुद्दीन शाह सांगणार क्रिकेटचा मनोरंजक इतिहास

लवकरच एका टीव्ही शोमधून हिंदी चित्रपटातील दिग्गज कलाकार नसीरुद्दीन शाह झळकणार असून नसीरुद्दीन शाह हे क्रिकेट खेळाविषयीच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतील. क्रिकेट हा भारतातील खूप लोकप्रिय खेळ आहे. या खेळाचा इतिहास आणि त्याच्याशी संबंधित अनेक किस्से या कार्यक्रमातून नसीर आपल्याला सांगणार आहेत. 
 
भारतीयांचा हा अमाप आवडणारा खेळ ब्रिटिशांनी सुरू केला. सुरुवातीला मातीच्या मैदानावर सुरू झालेला हा खेळ हिरव्यागार स्टेडियमवर कसा पोहोचला याचा रंजक इतिहास यात मांडला जाणार आहे. नसीरुद्दीन शाह यांनाही लहानपणापासून क्रिकेटची आवड आहे. त्यांनी इक्बाल या चित्रपटात क्रिकेट प्रशिक्षकाची भूमिका केली होती. 
 
हा कार्यक्रम ‘द एपिक’ या वाहिनीवर जुलैपासून सुरू होणार आहे.