शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जुलै 2014 (16:27 IST)

पाहा 'बैंग बैंग'चे टीजर (व्हिडिओ)

गांधी जयंतीच्या दिवशी अॅक्शनने भरपूर चित्रपट 'बैंग बैंग'चे प्रदर्शन होणार आहे. रितिक रोशन आणि कॅटरीना कैफ अभिनित हे चित्रपट 'नाइट एंड डे'चा हिंदी रीमेक आहे. या चित्रपटाला हिंदीसोबतच इतर भाषांमध्ये रिलीज करण्यात येईल. चित्रपटाचा टीजर बघून ऋत्विक आणि कॅटरीनाच्या चाहत्यांना आता वाट बघणे फारच जड जात आहे. चित्रपटाची एक झलक बघून वाटत आहे की अॅक्शन या चित्रपटाचा जीव आहे. हँडसम रितिक आणि सुंदर कॅटरीनाची जोडी फारच छान दिसत आहे. सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याच दिवशी शाहिद-श्रद्धा अभिनित 'हैदर'पण रिलीज होत आहे आणि दोन्ही चित्रपटांची टक्कर रोचक असणार आहे.