बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जुलै 2014 (12:30 IST)

पुण्यतिथी विशेष: भारताचे पहिले सुपरस्टार होते राजेश खन्ना

राजेश खन्ना यांचे हिंदी चित्रपटात येण्याअगोर फिल्म कलाकारांची ओळख मोठे स्टार्स म्हणून होत होती. पण राजेश खन्नाच्या आगमनानंतर भारतीय सिनेमाला पहिला सुपरस्टार मिळाला जो प्रत्येक दिशेने मोठा, भव्य आणि लोकांना वेड लावण्यासारखा होता.  
 
29 डिसेंबर 1942ला अमृतसरमध्ये जन्म घेणार्‍या राजेश खन्नाला लहानपणीच त्यांच्या आई वडिलांनी एका दांपत्याला दत्तक दिले होते. आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजेश खन्ना चित्रपटात आपले भाग्य अजमावण्यासाठी मुंबईत आले होते. ते बॉलीवूडचे पहिले असे स्ट्रगलर होते जे त्यावेसेळ सर्वात महागडी कार एमजी स्पोर्टस कारमध्ये स्ट्रगल करताना फिरत होते.   
 
राजेश खन्नाने हिन्दी चित्रपट आखिरी खतपासून हिंदी सिनेमात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी बरेच चित्रपट केले पण त्यांना खरी ओळख मिळाली ती आराधना चित्रपटापासून. आराधना नंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. एका नंतर एक बरेच सुपर डुपर हिट चिपपट देऊन राजेश खन्ना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीचे पहिले सुपर स्टार बनले. तरुण मुली त्यांच्यावर जीव देण्यासाठी तयार असायचा.  
 
राजेश खन्नाने आपल्या चार दशकाच्या अभिनय करियरमध्ये सहा फिल्मफेयर अवॉर्ड जिंकले. त्यांना हिंदी चित्रपटात आपल्या योगदानासाठी वर्ष 2008मध्ये दादा साहेब फाल्के अवॉर्डाहून सन्मानित करण्यात आले.