गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (17:02 IST)

प्रियंका चोप्राचे लग्न न करण्याचे कारण ?

बॉलिवूडची पिकी चॉप्स म्हणजेच प्रियंका चोप्राचा चित्रपट ‘मेरी कोम’ प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा आली होती. त्यावेळेस प्रियंकाला पत्रकारांनी प्रश्न विचारला की, ‘तू लग्न केव्हा करणार?’ त्यावेळेस प्रियंकाने उत्तर दिले की, ‘तुम्ही अभिनेत्यांनाही हा प्रश्न करता की नाही?’ पुढे ती म्हणाली की, ‘‘मला तर तेव्हापासून लग्न करायचं होतं जेव्हा मी ४ वर्षांची होते. मी प्रत्येक फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये नवरी बनून जायची. मला कानातले घालण्याचा, टिकली लावण्याचा आणि डोक्यावर पदर घेण्याचा खूप छंद होता. प्रत्येक मुलीला लग्न करायची इच्छा असते; पण माझ्या इच्छा जरा मोठ्या आहेत. मला माझ्या लायक मुलगाच मिळत नाही. जेव्हा तसा मुलगा मिळेल तेव्हा मी लग्न करेन.’ ’