मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 28 जुलै 2014 (11:40 IST)

प्रियंका साकारणार अमृता प्रीतम

सध्या हिंदी सिनेसृष्टीत बायोपिक बनण्याची क्रेझ आहे आणि या चित्रपटात काम करण्यासाठी प्रियांका चोप्रा सर्वात पुढे असून ती आज अशा चित्रपटांसाठी प्रत्येक निर्मात्याची पहिली पसंती आहे. प्रियंका आता मेरी कोम या चित्रपटानंतर साहिर लुधियानवी यांच्या ‘गुस्ताखियां’मध्ये साहिर लुधियानवीच्या प्रेमिका व लेखिका अमृता प्रीतमची भूमिका करणार आहे. या चित्रपटाची घोषणा मागील वर्षीच होणार होती, परंतु चित्रपटात साहिर लुधियानवीच्या भूमिकेमुळे थोडा तणाव निर्माण झाला होता. इरफान खान साहिरच्या भूमिकेत दिसणार असून बॉम्बे टॉकीजचे निर्माता अशी दुआ हा चित्रपट बनविणार आहेत. अशीला वाटते प्रियांका या भूमिकेसाठी परफेक्ट आहे. साहिरचे पहिले प्रेम अमृतावर होते आणि दोघांची हीच लव्हस्टोरी या चित्रपटात दिसणार आहे.