शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 27 नोव्हेंबर 2014 (15:27 IST)

प्रियंकाचा बहिणीला पाठिंबा

प्रियंकाने बॉलिवूडमध्ये छान यश संपादन केलं आहे. प्रियंकाची ही प्रगती पाहून आता तिच्या बहिणींनीही तिच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूडचा रस्ता धरला आहे. त्यामुळे प्रियंकाच्या बहिणींची संख्या बॉलिवूडमध्ये वाढतच आहे. परिणितीनंतर प्रियंकाची अन्य एक बहीण मनारा ‘जिद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि प्रियंका नेहमीच आपल्या बहिणींना सपोर्ट करत आली. यावेळीही तिने मनाराला पाठिंबा देण्याचं मनोमन ठरवलं आहे. त्यासाठीच ती ‘जिद’च्या म्युझिक लाँचदरम्यान एक स्पेशल अपिरन्स देणार आहे. बॉलिवूड सूत्रांनी आणलेल बातमीनुसार प्रियंका सध्या ‘बाजीराव मस्तानी’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. ‘जिद’च्या या कार्यक्रमात ती थेट ‘बाजीराव मस्तानी’ च्या सेटवरूनच पोहोचणार आहे. तिला स्वत:लाच इथे यायचं आहे आणि आपल्या बहिणीला प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना पाहायचं आहे. असो. प्रियंका कितीही व्यस्त असली तरी आपल्या भावा-बहिणींसाठी वेळ काढतेच. काही महिन्यांपूर्वी प्रियंका पुण्यात झालेल्या तिच्या भावाच्या बिझनेस लाँच कार्यक्रमालाही  उपस्थित होती.