शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 28 जुलै 2014 (11:13 IST)

'प्रीती झिंटा ही नेस वाडियाशी उद्धट वागली होती'

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचा माजी प्रियकर नेस वाडिया यांच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. एका साक्षीदाराने प्रीती झिंटाच्या विरोधात साक्ष दिली आहे. सायन दारू असे साक्षीदाराचे नाव आहे.
 
30 मे रोजी वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यावेळी घाणेरडे शब्द वापरले, असा जबाब सायन दारु याने पोलिसांना दिला आहे. प्रीती झिंटाने नेस वाडियाविरोधात विनयभंगाची तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर वाडिया याने त्याच्याकडून काही साक्षीदारांची नावे पोलिसांकडे दिली आहेत. त्यानुसार पोलिस साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत.