बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 17 सप्टेंबर 2014 (13:14 IST)

प्रीती सलमानसोबत आहे अमेरिकेत

अभिनेत्री प्रीती झिंटा बॉयफ्रेंड नेस वाडियाच्या विरोधात गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर चर्चेत आली आहे. आता या घडीला प्रीती कुठेही गेली तर तिला याबाबत प्रश्न विचारून भंडावून सोडले जात होते.

ती चक्क हे टाळण्यासाठी अमेरिकेला परत गेली असून अमेरिकेत सध्या सलमान खान हादेखील असून, त्याला अनेकवेळा प्रीती झिंटासोबत शॉपिंग करताना, तसेच एकत्रित डिनर करताना पाहण्यात आल्याचा दावा मीडियाने केला आहे. सलमान आणि प्रीती जुने मित्र आहेत. या दोघांमध्ये आता काय शिजत आहे, असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच आहे. अडचणीत सापडलेल्या प्रीतीला सलमान मदत करीत असल्याची चर्चा आहे.