बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

फिरोज खान यांची प्रकृती गंभीर

IFMIFM
कर्करोगामुळे त्रस्त असणारे अभिनेता फिरोज खान यांनी मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याबाबत खान आणि रोशन कुटुंबाला माहिती मिळताच ते रूग्णालयात दाखल झाले. 'काइटस' चे शूटिंग थांबवून ऋतिकही रूग्णालयात आला. नुकताच येऊन गेलेल्या 'वेलकम' या चित्रपटात फिरोज खान यांनी डॉनची भूमिका केली होती.