गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 28 जानेवारी 2016 (11:47 IST)

बाजीरावाशी निगडित सर्वात मोठा सत्य, जे चित्रपटात दाखवण्यात चुकले भंसाली!

जेव्हा संजय लीला भंसाळीने बाजीराव मस्तानी नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती, तेव्हा असं वाटत होते की आतापर्यंत हिंदुस्तानाच्या इतिहासकारांनी मराठा इतिहासाचे सर्वात मोठे नायकाबरोबर जो अन्याय केला आहे, तो बर्‍याचपैकी दूर होईल. शिवाजी यांनी एका स्वप्नाचा पाया ठेवला होता, पण त्यांच्या या स्वप्नाला पूर्ण केले होते बाजीराव बल्लाल भट्ट अर्थात पेशवा बाजीराव प्रथम यांनी. किती लोक त्यांना ओळखत होते? संजय लीला भंसाळीने एकाप्रकारे इतिहासावर एक उपकार केला आहे. मराठा आणि हिंदुस्तानच्या इतिहासासोबत न्याय केला आहे, पण हा न्याय अजूनही अपूर्ण आहे.  

भंसाळीची मजबुरी होती की चित्रपटाला हिंदू-मुस्लिम दोन्ही प्रकारच्या प्रेक्षकांच्या कसोटीवर खरे उतरून त्यांचे रोमँटिक चरित्र कायम ठेवले. प्रश्न आहे काय होते शिवाजींचे स्वप्न ज्याला बाजीराव बल्लाल भट्ट यांनी पूर्ण करून दाखवले? जेव्हा औरंगजेबच्या दरबारातून अपमानित झालेले वीर शिवाजी आग्रेतून त्याच्या कैदीतून पळाले होते तेव्हा त्यांनी एकच स्वप्न बघितले होते की संपूर्ण मुघल साम्राज्याला खाली पाडायचे. मराठा ताकदीची जाणीव संपूर्ण हिंदुस्तानाला करवायचा. अटक ते काटकापर्यंत भगवा फडकवायचा आणि हिंदू स्वराज्य आणायचा. या स्वप्नाला कोणी पूर्ण केले? पेशवांमध्ये, खासकर पेशवा बाजीराव प्रथम यांनी. 19-20 वर्षाच्या या युवाने तीन दिवसांपर्यंत दिल्लीला ओलीस बनवून ठेवले. मुघल बादशहाची लाल किल्ल्याहून बाहेर निघण्याची हिंमत झाली नाही. हेच नव्हेतर 12वा मुघल बादशहा आणि औरंगजेबाचा नातू दिल्लीतून बाहेर पळणारच होता की बाजीराव मुघलांना आपली ताकद दाखवून परतले. हे सर्व भंसाळी यांनी आपल्या चित्रपटात दाखवले नही, जेव्हाकी प्रत्येक तिसर्‍या दृश्यात बाजीराव यांना हे म्हणताना दाखविले की दिल्लीला तर आम्ही कधीही पाडू शकतो. असं वाटत होते की भंसाळी मराठा साम्राज्याचे ते स्वप्न पडद्यावर पूर्ण झालेलं दाखवतील, पण ते चुकले. 

पुढच्या पिढ्या बाजीराव यांना ओळखतील, याचे क्रेडिट भंसाळी यांना मिळायला पाहिजे, पण एका रोमँटिक हीरोप्रमाणे ओळखतील, एक असा योद्धा ज्याने कट्टर ब्राह्मणांशी टक्कर घेऊन आपल्या मुस्लिम बायकोचा साथ दिला. मुलाला संस्कार न दिल्याबद्दल त्याचे नाव रागाने कृष्णा पासून शमशेर बहादूर ठेवून दिले, म्हणून ओळखतील. जोधा अकबर प्रमाणे बाजीराव मस्तानीला देखील ओळखण्यात येईल. पण या पिढीला हे कळेल की हिंदुस्तानाच्या इतिहासात बाजीराव असा योद्धा होता, ज्याने 41 लढाया लढल्या होता आणि एकादाही त्याचा पराभव झाला नव्हता.  

बाजीरावाला माहीत होते की इतिहास त्याच्याबद्दल काय लिहेल. त्याने सादात खां आणि मुघल दरबाराला पाठ शिकवायचा विचार केला. त्या वेळेस देशात कुठलीही अशी ताकद नव्हती, जी सरळ दिल्लीवर आक्रमण करण्याचा स्वप्न देखील मनात आणू शकत होती. मुघल आणि खास करून दिल्लीची भिती सर्वांनाच होती. पण बाजीरावाला माहीत होते की ही भिती तेव्हाच दूर होईल जेव्हा मुघलांची जड अर्थात दिल्लीवर हल्ला होईल. सर्व मुघल सेना आग्रा मथुरेत अडकली आणि बाजीराव दिल्लीपर्यंत पोहोचून गेला, आज जेथे तालकटोरा स्टेडियम आहे, तेथे बाजीरावाने डेरा टाकला होता. दहा दिवसांचा रस्ता बाजीरावाने फक्त 500 घोड्यांच्या मदतीने 48 तासांमध्ये पूर्ण केला, तो ही न थकता न थांबता. देशाच्या इतिहासात आतापर्यंत फक्त दोन आक्रमण सर्वात वेगवान मानण्यात आले आहे, एक अकबराचा फतेहपुर ते गुजरातच्या विद्रोहाला दबवण्यासाठी 9 दिवसांच्या आत परत गुजरात जाऊन हल्ला करणे आणि दुसरा बाजीराव यांचा दिल्लीवर हल्ला. आजच्या पिढीला बाजीराव बल्लाल भट्ट याच्या जीवनातील ही बाजू जाणून घेण्याची गरज आहे.