मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बिपाशाच्या योगा धडय़ांचे 45 लाख बिल

फिटनेस मेंटेन करण्याच्या बाबतीत बिपाशा बसू चांगलीच प्रसिद्ध आहे. फिटनेसच्या तिच्या सीडीजही बाजारात उपलब्ध आहेत. बिपाशाचे योगावरील प्रेम आणि त्यावर तिची असलेली कमांड सर्वश्रुत आहे. पण बिपाशा बसूसोबत कर्नाटक सरकारने आयोजित केलेला कार्यक्रम मात्र वादात सापडला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे एकूण बिल 45 लाख रुपये इतके झाले असून कर्नाटक सरकारनेही बिल देण्यास नकार दिला असून इतके बिल कसे झाले याचा खुलासा संयोजकांकडे मागितला आहे. 
 
बिपाशा बसूची फी यात समाविष्ट असल्याची चर्चा सुरू झाली असून बिपाशामुळेच या कार्यक्रमाचे बिल इतके झाले आहे असे सांगितले जाते आहे. पण बिपाशाच्या प्रवक्त्याने मात्र याचा इन्कार केला असून या वादात बिपाशाला ओढले जाऊ नये, ती योगाच्या प्रसारासाठी या कार्यक्रमात सहभागी झाली होती, असा खुलासा करण्यात आला आहे. बंगळुरुमधील योग प्रसार करणारी संस्था ‘श्वास’च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात 
 
आले होते. मुख्यमंत्री सिद्धरामैय्यादेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. गेल्यावर्षी याच संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी हा खर्च 11 लाख इतका झाला होता, आता हा खर्च 45 लाख कसा असा सवाल सरकारने केला आहे.