गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

बुध्दीमान मल्लिका शेरावत

WDWD
सेक्स सिम्बल बॉलीवूड तारका मल्लिका शेरावत आता बुध्दीमानही झाली आहे. मल्लिका नुकतीच मलेशियाहून मायानगरीत परतली आहे. मलेशिया ती कुठल्या फिल्मच्या शूटिंगसाठी नाही तर तिला ग्लोबल ब्रांड फोरम 2008 मध्ये आमंत्रित करण्यात आले होते. मल्लिका एक्सपर्ट पॅनलमध्ये ती होती. हॉलीवुड फिल्मकार ओलिवर स्टोन यांच्याशी मल्लिकाने मनोसक्त चर्चा केली.

मल्लिकाने चित्रपट व्यवसायातील आव्हाने व संधी तसेच भारतीय फिल्मचे ब्रांड्स व व्यवसायावर होणारा परिणाम, अशा कठीन विषयावर मांडलेल्या महत्त्वपूर्ण विचारांनी उपस्थिताना प्रभावित केले. टीव्ही जगतातील नामांकीत रिज़ खानने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
WDWD

आनंदाने मोहून गेलेल्या मल्लिकाने सांगितले की, त्यावेळी तिला आश्चर्य वाटले ते म्हणजे ग्लोबल फोरममध्ये ओलिवर स्टोनसोबत तिला आमंत्रित केल्याचे. ओलिवरने प्रत्येक संधीचे सोने केले आहे. प्रेक्षकांनी एकदा पाठ फिरवले म्हणून वाईट न वाटून घेता, त्यांना चित्रपटात आणखी काय हवे आहे. ते आपण त्यांना दिले पाहिजे. जेकेएफ, नॅच्युरल बोर्न किलर्स व यू टर्न सारख्या सुपरहीट फिल्मकार सोबत कार्यक्रमात आमंत्रण मिळणे हे तिच्यासाठी गौरवशाली असल्याचे मल्लिका म्हणाली.

सध्या मल्लिका 'हिस्स'मध्ये काम कर‍त आहे. त्याला जेनिफर लिंच दि‍ग्दर्शित करत आहे. मल्लिका त्यात 'स्नेक वूमन' ची भूमिका साकारत आहे.