गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 25 जुलै 2014 (10:58 IST)

बॉलिवूड अभिनेत्री सोहा व कुणालचा साखरपुडा

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान व अभ‍िनेता कुणाल खेमू यांनी अखेर साखरपुडा केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे एकत्र आहेत. कुणालसोबत साखरपुडा झाल्याचे सोहाने 'ट्विट'केले.

कुणालने तिला पॅरिस येथे लग्नासाठी मागणी घातली होती. सोहाने कुणालचा प्रस्ताव स्वीकारला होता. दोघांनी साखरपुडा केला असून लवकरच दोघे विवाहबद्ध होणार आहे. विवाहाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे सोहाने सांगितले आहे. लवकरच लग्नाच्या तारखेची घोषणा करणार असल्याची सोहा म्हणाली. 2009 मध्ये ‘99’ या चित्रपटात दोघे एकत्र दिसले होते.