मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

बॉलिवूड कलाकारांपेक्षा जास्त कपिलची कमाई

टीव्ही कलाकारांपेक्षा बॉलिवूडमधील कलाकारांची कमाई ही अधिक असते असे म्हटले जाते. मात्र याला कॉमेडियन कपिल शङ्र्का अपवाद ठरला आहे. टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहरा म्हणजे कपिल शर्मा. 
 
त्याच्या द कपिल शर्मा शोला चांगला टीआरपीही मिळत आहे. कपिलने त्याच्या जोरावर या शोला नंबरवन वर नेले आहे. त्यासाठी तो चांगले मानधनही घेतो. कपिल शर्माची महिन्याची कमाई इतकी आहे की तितके मानधन बॉलिवूडच्या फेमस अभिनेत्रींनाही मिळत नाही. आलिया भट्ट, श्रद्धा कपूर आणि परिणिती चोप्रासारख्या अभिनेत्री वर्षातून एखादा चित्रपट करतात.
 
ट्रेड अँनॅलिस्टच्या मते एका चित्रपटासाठी आलिया भट्टला 4-5 कोटी रुपये मिळतात. तर श्रद्धा कपूरला 3-4 कोटी आणि परिणिती चोप्राला 2-3 कोटी रुपये मिळतात. एवढेच नव्हे तर आदित्य रॉय कपूर आणि टायगर श्रॉफ यांनाही एका चित्रपटासाठी फक्त 6 कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळते. एका वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, कपिल शर्मा आपल्या शोसाठी प्रतिदिन 60 ते 80 लाख रुपये घेतो. म्हणजेच दर महिन्याला तो तब्बल 25 कोटी रुपये कमावतो. वर्षातून इतकी मोठी रक्कम वर्षातून एखादा चित्रपट करणार्‍या अभिनेत्यालाही मिळत नाही. 2014-15 पासून कपिलच्या मानधनात वाढ होत आहे. ज्याप्रमाणे शोचा टीआरपी वाढतो त्याप्रमाणे कपिलचे मानधनही वाढते. मोठय़ा कमाईच्या यादीत कपिल शर्माच्यानंतर सुनील ग्रोव्हरचा नंबर लागतो.