गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (14:28 IST)

बॉलिवूडला आणखी एक ‘आलिया’ देणार करण

करण जोहरला बॉलिवूडचा असा डायरेक्टर-प्रोड्यूसर मानले जाते, ज्याने एकाच चित्रपटातून बॉलिवूडला तीन तरुण आणि यशस्वी कलाकार दिले. करणने ‘स्टुडेंटस् ऑफ द ईयर’ चित्रपटात आलिया भट्ट, वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्राला यशस्वी पदार्पण करण्याची संधी दिली. या चित्रपटाच्या यशानंतर या तिघांचा बॉलिवूडमधील प्रवास जोरदारपणे चालू आहे. यानंतर करण आता बॉलिवूडला आणखी एक ‘आलिया’ देणार आहे. करण लवकरच त्याच्या बॅनरखाली ‘नो सेक्स प्लीज वी आर इंडियंस’ नावाचा एक चित्रपट तयार करत आहे. चित्रपटाची संपूर्ण तयारी झाली आहे. चित्रपटातील कास्टसंदर्भात अजून सस्पेंस कायम असला तरीही अभिनेत्री फायनल झाली आहे. या चित्रपटात दिशा पाटनी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची कथा सोनम नायरने लिहिली आहे. सोनमने यापूर्वी ‘गप्पी’ चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण आणि टीव्ही क्वीन एकता कपूर हे दोघे करणार आहेत. 19 वर्षीय दिशा पाटनी ‘नो सेक्स प्लीज वी आर इंडियंस’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मॉडेलिंग क्षेत्रामध्ये तिने मोठे नाव कमावले आहे. त्याचबरोबर 2013 मध्ये फेमिना मिस इंडिया इंदौरची ती रनअप राहिली असून फ्रेश फेस हंट 2012 ची विजेता आहे. दिशाने नुकतेच काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. दिशाने आलियाप्रमाणे मानेवर एक टॅटू गोंदवला आहे. बॉलिवूडच्या इतर अभिनेत्रींप्रमाणे दिशा पाटनीसुद्धा इंस्टाग्रामवर सक्रिय आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमधून तिचा ग्लॅमरस लूक झळकतो.