शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 6 मे 2015 (13:09 IST)

बॉलीवूडच्या या तारकांनाही झाली आहे शिक्षा!

बारा वर्ष जुने हिट एंड रन केसमध्ये अभिनेता सलमान खान याला बुधवारी शिक्षा झाली असून तो संजय दत्त नंतर तुरुंगात जाणारा दुसरा मोठा अभिनेता असेल. आपण जाणून घेऊ की आतापर्यंत कुठल्या कुठल्या फिल्मी तारकांना शिक्षा झाली आहे.... 
 
मोनिका बेदी : 2002 मध्ये पुर्तगालमध्ये अबू सलेमची प्रेयसी मोनिका बेदीला अटक करण्यात आली होती. 2005मध्ये भारत प्रत्यर्पण झाले. 2006मध्ये न्यायालयात शिक्षा ठोठावण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर 2010मध्ये तुरुंगातून सुटका झाली.  
 
आरोप : 1993मध्ये मुंबई बॉम्बं धमाक्याचा आरोपी आरोपी अबू सलेमसोबत बनावट पासपोर्टच्या माध्यमाने देश सोडून फरार झाली होती.  
 
संजय दत्त : जुलै 2007मध्ये टाडा कोर्टाने 6 वर्षाची कडक‍ शिक्षा ठोठावली. 21 मार्च 2013ला सुप्रीम कोर्टाने या शिक्षेला खरं ठरवले   आणि शिक्षेचा काळ 5 वर्ष ठेवला. अद्याप तुरुंगात आहे. 
 
आरोप : 1993 मुंबई बॉम्बं धमाक्यांच्या आरोपींकडून बेकायदेशीर शस्त्र विकत घेतले होते. सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये.  
 
शाइनी आहूजा : बॉलीवूड अभिनेता शाइनी आहूजाला 31 मार्च 2011ला मुंबईच्या कोर्टाने सात वर्षाची शिक्षा ठोठावली. सध्या जामिनीवर आहे.  
 
आरोप : घरगुती मोलकरीणवर बलात्कार करण्याचा आरोप. 14 जून, 2009ला अटक. किमान 3 महिने तुरुंगात राहिला.  
 
विंदू दारासिंह : 21 मे 2013ला अटक करण्यात आला होता. 4 जून 2013 पर्यंत तुरुंगात राहिला. केस अद्याप विचाराधीन. 
 
आरोप : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सट्टेबाजीचा आरोप. एका बुकीच्या बयानावर अटक करण्यात आली होती.