शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 जुलै 2015 (10:39 IST)

भाग्यश्री ’सुकन्या’ची अँम्बेसेडर

केंद्र शासनाच्या ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या योजनेच्या धर्तीवर राज्यात भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा नुकताच शुभारंभ झाला. अभिनेत्री भाग्यश्री या योजनेची जनजागृती करणार असून राज्य सरकारने या ‘सुकन्या’ योजनेसाठी भाग्यश्रीची अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. 
 
या योजनेअंतर्गत एक मुलगी असेल आणि आईने या मुलीच्या जन्माच्या वेळीच अंतिम कुटुंब नियोजन केले असेल तर संबंधित मुलीच्या नावे पाच हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच ही मुलगी पाच वर्षाची होईपर्यंत तिला दर्जेदार पोषण आहारासाठी प्रतिवर्षी हजार रुपये देण्यात येतील. मुलीच्या प्राथमिक शिक्षणासाठी प्रतिवर्ष अडीच हजार प्रमाणे 4 वर्षानंतर 10 हजार देण्यात येतील. 
 
याशिवाय एकुलती एक मुलगी असलेल्या आईने दुसर्‍या मुलानंतर अंतिम कुटुंब नियोजनाची हमी दिल्यास अथवा दुसर्‍यांदा मुलगी झाल्यानंतर कुटुंब नियोजन केल्यास प्रतिवर्ष अडीच हजार याप्रमाणे पाच वर्षापर्यंत देण्यात येणार आहेत. या मुलीच्या माध्यमिक उच्चशिक्षणासाठी प्रतिवर्षी हजार प्रमाणे 16 हजार रुपये देण्याची तरतूद आहे.