गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जानेवारी 2016 (10:33 IST)

मराठीत येईन पण एका अटीवर!

एका मराठी पुरस्कार सोहळ्यात सनी लिओनला लावणीवर थिरकताना पाहिल्यावर, ती मराठीत कधी येणार याची उत्सुकता अनेकांना लागलीय. फक्त मराठीत येण्यासाठी तिची एक अट आहे. काय आहे ती अट हे तिनं शेअर केलं. बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री सनी लिओन आता मराठीशी कनेक्ट होऊ पाहतेय. ‘हळू हळू’ आणि ‘नको नको’ या शब्दांनी मराठी शिकायला सुरूवात करणारी सनी मराठीत झळकणार असल्याची चर्चाही झाली. त्या केवळ अफवाच असल्याचं नंतर स्पष्ट झालं. मात्र ‘मराठी सिनेमाचा विषय मला आवडला तर अगदी मानधनाच्या रकमेत तडजोड करूनही मी त्यात जरुर काम करेन’, असं तिनं सांगितलं.
 
 आगामी ‘मस्तिजादे’ या बॉलिवूडपटात सनी साकारत असलेल्या लिली आणि लैला या डबल रोलमधील भूमिकांचं आडनावही अस्सल मराठी, म्हणजे ‘लेले’ असे आहे. मग तुला मराठी चित्रपटात तिला काम करावंसं वाटतं का? असं तिला विचारलं होतं. सनी सांगते, की ‘चित्रपटाची कथा चांगली असेल तर निश्चितच मला मराठीत काम करायला आवडेल. या संस्कृतीत आणि भाषेमध्ये एक निराळाच गोडवा आहे.’मात्र बॉलिवूडच्या तुलनेत मराठी चित्रपटांचं बजेट फार कमी असतं. अशावेळी ती पैशाला प्राधान्य देईल की कथेच्या आशयाला असं विचारल्यावर तिनं चटकन, ‘अर्थातच आशय’ असं उत्तर दिलं. ‘आजचा प्रेक्षकवर्ग बदलतोय. कुठलेही सुपरस्टार नसताना केवळ आशयाच्या जोरावर चाललेले अनेक सिनेमे आपण बघितलेत. मुळात उत्तम आशय हेच मनोरंजनविश्वाचं भविष्य आहे. अशावेळी माझी मानधनाच्या बाबतीतही तडजोड करायची पूर्ण तयारी आहे’असं सनी बिनधास्तपणे सांगते.