शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2015 (10:39 IST)

महिलांचा आदर न करणारे पुरूष राक्षसी प्रवृत्तीचे असतात: सनी लिऑन

बॉलीवूडची हॉट अभिनेत्री सनी लिऑनने भारतीय पुरुषांना उद्देशून एक सल्ला दिला आहे. भारतीय पुरुष महिलांकडे कशाप्रकारे पाहतात आणि महिलांकडे वाईट नजरेने पाहणारे पुरुष कोणत्या प्रवृत्तीचे असतात, यावर सनी लिऑनने भाष्य केले आहे.

महिलांसोबत गैरव्यवहार करणारे, महिलांचा योग्य तो आदर न राखणारे हे राक्षसी प्रवृत्तीचे असतात, असे अभिनेत्री सनी लिऑनने म्हटले आहे.

मी भारतीय नाही आणि भारतीय नसल्याचे मला दु:खही नाही. मात्र मी एका अशा संस्कृतीत वाढली आहे, जिथे ‘व्यक्तिस्वातंर्त्य’ ही काही असामान्य गोष्ट नव्हती. जर कुणी पुरुष महिलांच्या स्वातंर्त्यावर गदा आणत असेल, तर ते चूक आहे. शिवाय महिलांच्या स्वातंर्त्यावर गदा आणणारे पुरुष राक्षसी प्रवृत्तीचे असतात, असेही सनी लिऑनने म्हटले आहे.

सनी लिऑनने तमाम पुरुषवर्गाला सल्लाही दिला आहे. सनी म्हणते, पुरुषांनी महिलांचा आदर राखला पाहिजे. शिवाय कुठे काही चुकीचे घडत असेल तर गप्प बसू नका. अन्याय होत असताना गप्प बसणे हाही एक गुन्हा आहे. जर तुमच्या मनात महिलांबद्दल आदर असेल तर त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाजही उठवा.