बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 सप्टेंबर 2015 (10:34 IST)

मावराने ‘फँटम’ला दिला पाठिंबा

पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री मावरा होकेनने एक ट्विट ‘फँटम’च्या बॅनला चुकीचे सांगितले आहे. 
 
मावराने आपल्या टि्वटमध्ये सांगितले, ‘फँटम दहशतवाद्यांच्या विरोधातील सिनेमा आहे.’ मावराच्या या ट्विवर त्यांच्याच देशातील एक प्रसिद्ध अभिनेता शान शाहिद भडकला. शाहिदने मावरावर बॅन लावण्याची मागणी केली आहे. काही लोकांनी मावराच्या म्हणण्याला योग्य म्हटले आहे तर काहींनी तिचा विरोध केला आहे. मावराने बॉलीवूडचे तीन सिनेमे साइन केल्याचे सांगितले जाते आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमांच्या शूटिंगसाठी ती भारतात आली होती. मावराने आपल्या ट्विटमध्ये म्हटले, ‘फँटम सिनेमा दहशतवाद्यांच्या विरोधात आहे. एका दहशतवाद्याचा कोणत्याच देशाशी काहीही संबंध नसतो, कारण तो दहशतवादी फक्त दहशतवादीच असतो.’ 
 
त्यानंतर मावराने आणखी तीन ट्विट केले. त्यामधील एका ट्विटमध्ये ती म्हणते, ‘जर फँटम अँटी-टेरेरिज्मवर आहे तर मी त्यालासुध्दा पाठिंबा देते. मी कोणत्या देशाची आहे, याचा काहीही फरक पडत नाही. मी माणुसकीला आणि प्रेमाला पाठिंबा देते.’