शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

योग्य वाटणार्‍या गोष्टीच मी केल्या: राधिका आपटे

गेल्या काही दिवसांपासून लीक झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री राधिका आपटे हिनं ‘मला योग्य वाटलेल्या गोष्टीच मी नेहमी करत आलेय’ असं म्हटलंय. आपल्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असणारी राधिका आपटे ‘बदलापूर’, ‘मांझी- द माउंटन मॅन’ यांसारख्या सिनेमांतून प्रेक्षकांसमोर आपल्या दमदार भूमिका सादर केल्या आहेत. 
 
राधिका आपटेच्या ‘पार्च्ड’ या आगामी चित्रपटातील काही दृश्य अगोदरच लीक झाल्यामुळे सध्या ती जास्त चर्चेत आहे. मात्र, ‘पार्च्ड’ चित्रपटातील कोणतंही दृश्य लीक झालेच नाहीत, असं राधिकानं म्हटलंय.