गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

रजनीकांतच्या कबालीला देखील पायरेसीचे ग्रहण!

दिवसेंदिवस प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लीक होण्याचे प्रमाण वाढत चालले असून सैराट,सुलतान, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती आणि असे अन्य काही चित्रपट लीक झाल्याने त्यांच्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर बराच परिणाम होताना दिसत आहे. त्यातच आता सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुप्रतिक्षित कबाली चित्रपटही लीक झाल्याचे वृत्त आहे. काही संकेतस्थळांवर जगभरात चर्चा असलेल्या या चित्रपटाची कॉपी डाउनलोडसाठी उपलब्ध असल्याचे वृत्त आहे. पण हा चित्रपट अद्याप शेअरींग साइट असलेल्या टोरन्टवर आलेला नाही. 
 
या चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही दिवसांपूर्वीच याची पायरेटेड कॉपी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात संपर्क साधला होता. १८० पेक्षाही अधिक संकेतस्थळांवरून या चित्रपटाचे बेकायदेशीर डाउनलोड थांबवण्यासाठी निर्माते एस थानु यांनी याचिकाही दाखल केली होती.
 
रजनीकांत आणि राधिका आपटेची प्रमुख भूमिका असलेला कबाली येत्या २२ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.