शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

रणबीर आणि कॅटरिनाचा होणार साखरपुडा?

बॉलिवूडचं हॉट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. या जोडीचे बीचवरचे फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या नात्याबाबत बॉलिवूड आणि बॉलिवूड फॅन्समध्ये प्रचंड चर्चा सुरू होती. आपल्या नात्याबद्दल ते गंभीर असल्याचं समजतंय. एका ऑनलाइन टेबलायडमधील एका रिपोर्टनुसार रणबीर कॅटरिनाच्या रोमांसच्या चर्चाना आता विराम द्यायचा, असं या जोडीनं ठरवलंय. म्हणूनच त्यांनी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलाय. साखरपुडय़ाची तारीख अजून ठरली नसली तरी दोघं याबद्दल खूप गंभीर आहेत.

PR


सुट्टय़ांचा आनंद घेण्यासाठी स्पेनमध्ये गेलेल्या रणबीर आणि कॅटरिनाचे आयबिज बीचवरचे फोटो लिक झाले होते आणि त्यानंतर दोघांच्या प्रेमसंबंधाबाबत चर्चा सुरू झाली. या फोटोंनी कॅटरिनानं ऋषी आणि नीतू कपूरचीही झोप उडवून दिली होती. तर या फोटोंच्या प्रसिद्धीमुळं कॅटरिना चांगलीच भडकली होती. रणबीरचे आई-वडील हे फोटो बघून चांगलेच नाराज झाले असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळं आता त्यांच्या साखरपुडय़ाच्या निर्णयाबाबत ऋषी आणि नीतू कपूर काय म्हणतात, हेच बघावं लागेल.