बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 23 नोव्हेंबर 2015 (14:47 IST)

रणबीर, दीपिकाने ट्रेनद्वारे केला 'तमाशा'चा प्रचार

येणारे चित्रपट 'तमाशा'साठी प्रचार करण्याचा एक खास ट्रिक अपनवून अपनाते रणबीर कपूर, दीपिका पादुकोण आणि निर्देशक इम्तियाज अली रविवारी मुंबई ते दिल्लीच्या ट्रेनमध्ये यात्रेवर रवाना झाले.  

चित्रपटाची टीम मुंबई सेंट्रलपासून सुविधा एक्सप्रेस ट्रेनमध्ये स्वार झाले असून दिल्ली पोहोचण्याअगोदर ट्रेन वडोदरा, कोटामध्ये थांबणार आहे.  
 
या प्रसंगी दीपिकाने म्हटले, आम्ही आमची यात्रा सुरू केली आहे आणि मी फारच उत्साहित आहे. दीपिकाला ट्रेनने यात्रा करायची होती आणि रणबीरने तिची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी होकार दिला.  

रणबीरने म्हटले, आम्ही तसे ही दिल्ली जाणार होतो, आणि जेव्हा दीपिकाने ट्रेनद्वारे जाण्याची इच्छा दर्शवली तर आम्ही विमानाचे तिकिट कॅन्सल केले. ट्रेनमध्ये मीडिया आणि फिल्मच्या टीमसाठी एक वेगळा डब्बा जोडण्यात आला आहे. एखाद्या अप्रिय घटनेपासून बचाव करण्यासाठी सुरक्षा व्यवस्थापण करण्यात आली आहे. चित्रपट 27 नोव्हेंबर रोजी सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होईल.