गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मे 2016 (17:12 IST)

राधिकाने नाकारल्या ‘सेक्स कॉमेडी’

‘फोबिया’ या सिनेमातील कसदार अभिनयामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री राधिका आपटे सिनेमाची निवड करताना फारच विचारपूर्वक करते. बदलापूर या सिनेमानंतर ‘सेक्स कॉमेडी’च्या ऑफर आल्या होत्या, हे फारच विचित्र होते, असे ती म्हणाली. ‘मांझी’, ‘हंटर’, ‘अहल्या’ ही शॉर्ट फिल्म, ‘बदलापूर’ या सिनेमातून तिच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले होते. अँक्टिंगची ‘पॉवर हाऊस’ म्हणून तिची ओळख निर्माण होत असताना तिला काही निर्माते आणि दिग्दर्शकांनी ‘सेक्स कॉमेडी’ची ऑफर दिली होती. बदलापूरमधील काही बोल्ड सीनमुळे तिला या ऑफर येत होत्या. साहजिकच या सर्व ऑफर राधिकाने धुडकावून लावल्या. 
 
‘काही सिनेमांत मी बोल्ड भूमिका केल्या म्हणून मला सेक्स कॉमेडीच्या ऑफर्स येऊ लागल्या, हे फारच विचित्र होते,’ असे ती म्हणाली. टाईपकास्टचा शिक्का बसू नये यासाठी राधिका मोठी काळजी घेते. ‘शेवटी स्क्रिप्टवरच सारे काही अवलंबून असते. बदलापूर आणि अहल्यासारख्या शॉर्ट फिल्म का करायची नाही?’
 
एकूणच कोणती भूमिका स्वीकारायची यासाठी अत्यंत सजग असलेल राधिकाचे सिनेमे चाहत्यांना भावतात ते यासाठीच! ‘फोबिया’तील दमदार अभिनयानंतर तिचा रजनिकांतसोबत कबाली हा सिनेमा येत आहे. तसेच ‘पार्चड’ या सिनेमातही ती आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळ्या राधिकाची ही प्रगती नक्कीच सुखावणारी आहे.