शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:32 IST)

राधे माँ ‘बिग बॉस 9’मध्ये?

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु राधे माँ लवकरच रिअँलिटी शो बिग बॉसच्या नवव्या मोसमात दिसण्याची शक्यता आहे. एका न्यूज वेबसाईटच्या माहितीनुसार, शोच्या निर्मात्यांनी स्पर्धकांची निवड करण्यास सुरुवात केली आहे आणि यासंदर्भात राधे माँची भेट घेतली आहे. सर्व जुळून आलं तर नौटंकी क्वीन राधे माँ लवकरच बिग बॉसमध्ये दिसू शकते. मिनी स्कर्टमधील राधे माँचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर तिच्यावर कौटुंबिक छळाचे आरोपही करण्यात आले आहेत. त्यामुळे राधे माँच्या अडचणी वाढल्या आहेत. नुकतंच टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक डॉली बिंद्राने राधे माँवर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर डॉलीला सातत्याने जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. इतकंच नाही तर राधे माँवर न्यूड सत्संग आणि सेक्स पार्टीचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीमध्ये राधे माँचे अनेक फॉलोअर्स आहेत, ज्यातील काही जणांनी वादामुळे तिच्याशी फारकत घेतली आहे. डॉली बिंद्रा, दिव्यांका त्रिपाठी, मनोज तिवारी, पल्र्हाद कक्कड आणि सुभाष घई यांच्यासारखे अनेक सेलिब्सचे राधे माँसोबतचे फोटो मीडियामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.