गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 16 एप्रिल 2014 (18:09 IST)

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर 'यलो'सह 'फँड्री'ची छाप

61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज (बुधवारी) जाहीर करण्यात आले असून त्यावर मराठीत 'आजचा दिवस माझा' तर हिंदीत 'जॉली एल.एल.बी' या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. तर 'यलो' या चित्रपटाला स्पेशल ज्युरी अॅवॉर्ड देऊन गौरवण्यात आले आहे. विशेष म्हणजे 'फँड्री' चित्रपटातील सोमनाथ अवघडे याने सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला आहे.

याशिवाय सुमित्रा भावे, अमृता सुभाष यांना अस्तू चित्रपटासाठी अनुक्रमे उत्कृष्ट संवाद आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा पुरस्कार 'तुह्या धर्म कोंचा' आणि हिंदीतील 'गुलाब गँग' या चित्रपटाला मिळाला आहे.

पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे...
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- हंसल मेहता (शाहीद)
सर्वोत्कृष्ट संवाद - सुमित्रा भावे (अस्तू)
उत्कृष्ट सहायक अभिनेत्री - अमृता सुभाष (अस्तू) आणि आलिया अल-काशिफ (शिप ऑफ थिसूस)
उत्कृष्ट सहायक अभिनेता- सौरभ शुक्ला
सर्वोत्कृष्ट बालकलाकार- सोमनात अवघडे (फँड्री)
सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट- तुह्या धर्म कोंचा
सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म (सामाजिक)- गुलाब गँग
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- आजचा दिवस माझा
सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट- कफाल
बेस्ट साउंड डिझाइन- मद्रास कॅफे
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- जॉली एलएलबी
स्पेशल ज्युरी मेन्शन- गौरी गाडगीळ (येलो)
बेस्ट स्पेशल इफेक्ट- जल