गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 26 नोव्हेंबर 2014 (11:43 IST)

रितेश आणि जेनेलियाच्या घरी आला नवा पाहुणा

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखच्या घरी नवा पाहुणा आला आहे. रितेशची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया हिने मंगळवारी एका गोंडस मुलाला जन्म दिला. जेनेलिया आणि बाळ सुखरुप असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या गोड बातमीने देखमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण आहे.  रितेश याने 'ट्विटर'वरून ही गूड न्यूज दिली आहे. 'It's a BBOOOOYYYYYY!!!!!!!!' असे रितेश याने 'ट्विट' केले आहे. 
 
बाबा होणार असल्याचे समजताच रितेश जेनेलियाची काळजी घेत होता. तो जातीने लक्ष देत होता.
गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खानची बहिण अर्पिताच्या रिसेप्शनला ही बॉलिवूडची सुंदर जोडी उपस्थित होती. यावेळीही रितेश जेनेलियाची काळजी घेताना दिसला होता.
 
रितेश आणि जेनेलियाने आपल्या फिल्मी करियरला 2003 मध्ये सुरुवात केली होती. तुझे मेरी कसम या सिनेमात ही जोडी झळकली होती. नंतर 2012 मध्ये रितेश आणि जेनेलियाने विवाह केला. रितेश हा दिवंगत केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा धाकटा मुलगा आहे.