गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 27 मे 2015 (15:19 IST)

रितेशने प्रथमच आपल्या मुलाचे फोटो इंटरनेटवर अपलोड केले

अभिनेता रितेश देशमुखने प्रथमच आपल्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. या फोटोंमध्ये रितेश, त्याची बायको  जेनेलिया आणि त्यांचा सहा महिन्याचा मुलगा (रियान) दिसत आहे.  
 
‘ग्रैंड मस्ती’चे स्टार अभिनेता रितेशने ट्विट केले, ‘रियानने आम्हला पूर्ण केले जेनेलिया.’ दुसर्‍या फोटोत रियानला माजी नेते आणि दिवंगत आजोबा विलासराव देशमुख यांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याप्रती आदराचे भाव करताना दाखविले आहे.  
 
रितेशने लिहिले, ‘रियान त्याचे आजोबा विलासराव देशमुख यांच्या 70व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या प्रती आदर दाखवत आहे.’ एका दुसर्‍या फोटोत रितेशने रियानला कडेवर उचललेले आहे.  
 
रितेशने फोटोचे कॅप्शन लिहिले, ‘माझ्या वडिलांच्या 70व्या वाढदिवसाला रियान सहा महिन्याचा झाला.’ रितेशने जेनेलियाशी वर्ष 2012मध्ये लग्न केले होते. रियानचा जन्म मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. रितेश आणि जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’, ‘मस्ती’ आणि ‘तेरे नाल लव हो गया’मध्ये एकत्र काम केले आहे.