गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2015 (10:56 IST)

लारा दत्ताकडून फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट आल्यास..

अभिनेत्री लारा दत्ता जर तुमच्या फेसबुक फ्रेण्डस्मध्ये असेल आणि तुम्हाला तिच्याकडून मेसेज आला तर सावध व्हा. कारण लारा दत्ता फेसबुकवर नसून तिने आपल्या फेक अकाऊण्टपासून सावध राहण्याचं आवाहन चाहत्यांना केलं आहे. 37 वर्षाची माजी विश्वसुंदरी लारा दत्ता ट्विटरवर सक्रिय आहे, मात्र फेसबुकवर तिने अकाऊंट सुरु केलेलं नाही. त्यामुळे तिच्या नावे बनावट अकाऊंट ओपन झाल्याचं समजताच तिने ट्विटरच्या माध्यमातून मित्र, चाहते आणि फॉलोअर्सना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ‘मी फेसबुकवर नाहीये. माझ्या नावाने फ्रेण्ड रिक्वेस्ट आल्यास कृपया ती स्वीकारु नका. हे फेक प्रोफाईल आहे.’ असं लाराने ट्विटमध्ये म्हटलं आहे. टेनिसस्टार महेश भूपती आणि लारा यांना सायरा नावाची मुलगी आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन वर्षाच्या अंतराने लाराने ‘सिंग इज ब्लिंग’मधून मोठय़ा पडद्यावर पुनरागमन केलं आहे.