शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: चेन्नई , सोमवार, 28 जानेवारी 2013 (12:53 IST)

विश्वरूपम प्रदर्शनाबाबत निर्णय मंगळवारी

PR
PR
कमल हसन यांच्या विश्वरूपमवर चेन्नई उच्च न्यायालयाने निर्णय मंगळवारपर्यंत टाळला आहे. विशेष स्क्रनिंग दरम्यान मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींनी ‍विश्वरूपम बघितला होता.

दुसरीकडे कर्नाटकात चित्रपटगृह मालकांना पोलिसांचा आदेश मिळाल्याने प्रदर्शनास उशीर होण्याची शक्यता आहे. येथे रविवारपासून चित्रपट प्रदर्शित व्हायचा होता, मात्र कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन पोलिसांनी प्रदर्शनावर बंदी घातली होती.

तमिळ व तेलगु मध्ये 25 जानेवारीस प्रदर्शन निश्चित होते मात्र तमिळनाडू सरकारने मुस्लिम संघटनांच्या दबावामुळे प्रदर्शनावर बंदी घातली होती.

चित्रपटास समूदायाबाबत आक्षेपार्ह चित्रण असल्याचे संघटनांने म्हणने आहे. (वृत्तसंस्था)